खोट्या विवाह संस्था आणि फेक प्रोफाइल्सकडून पैशांची मागणी झाल्यास सावधान! 'मंगल परिणय' हेल्पलाईन नंबर जारी 9404343001
नाशिक/महाराष्ट्र:
सध्या डिजिटल युगात ऑनलाईन माध्यमातून विवाह जुळवण्याचे प्रमाण वाढले आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही भामट्यांनी आणि खोट्या विवाह संस्थांनी (Fake Matrimony) नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे सत्र चालवले आहे. सोशल मीडिया किंवा विविध मॅट्रिमोनी प्लॅटफॉर्मवर फेक प्रोफाइल्स (Fake Profiles) तयार करून आकर्षक स्थळांचे फोटो व खोटी माहिती दाखवली जाते. त्यानंतर नोंदणी शुल्क, सभासदत्व किंवा कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली नागरिकांकडून वारंवार पैशांची मागणी केली जाते.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर प्रकारची दखल घेत 'मंगल परिणय' संस्थेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अशा फसवणुकीपासून कसे राहावे सावध?
१. कोणत्याही अपरिचित किंवा संशयास्पद विवाह संस्थेवर अंधाधुंद विश्वास ठेवू नका.
२. प्रत्यक्ष भेट न घेता किंवा संस्थेची खात्री न करता ऑनलाइन पैसे पाठवू नका.
३. प्रोफाइल खरी असल्याची खात्री करण्यासाठी अधिकृत व विश्वासार्य प्लॅटफॉर्मचाच वापर करा.
'मंगल परिणय' हेल्पलाईन नंबर जारी:
जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही अशा कोणत्याही खोट्या विवाह संस्थेकडून अथवा फेक प्रोफाइलकडून पैशांची मागणी झाली किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तर अजिबात घाईघाईने पावले उचलू नका. या समस्येवर योग्य मार्गदर्शनासाठी 'मंगल परिणय'च्या विशेष हेल्पलाईनशी त्वरित संपर्क साधा.9404343001